भित्तीपत्रक प्रकाशन
विविध प्रसंगांना अनुसरून विविध विषयांवर आधारित भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात येते .यामुळे प्रसंगानुरूप विविध स्वरूपाची माहिती मिळते.
आज दि.27/07/2018 ए. पी.जे.कलाम यांच्या स्मृतिदिन व चंद्रग्रहण याचे अवचित्य साधून भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
आज डॉ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींचे स्मरन करून त्यांच्या जीवनगौरवाची ऑडीओ क्लिप विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आली ... शतकातील सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाची तसेच मंगळ ग्रहाची प्रतियुती विषयी माहिती सांगणारं भित्तीपत्रक आज शाळेतील Geo-Science Club मार्फत प्रकाशित करण्यात आलं
EACH ONE TEACH ONE
अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी व विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी मोठ्या वर्गातील मुलांना लहान वर्गातील मुलाला दत्तक देऊन त्याच्यामार्फत त्याला शिकवले जाते.यामुळे मुलामधील भीती कमी होऊन ते आपल्या मित्राकडून आत्मविश्वासाने शिकते.या उपक्रमाचा अप्रगत मुलासाठी छान होतो.हा उपक्रम दुपारी मोठ्या सुट्टीत घेतला जातो.त्यामुळे वेळेचा सदुपयोग होतो आणि सुट्टीत शिस्त राहते मुले गोंधळ घालत नाहीत.
📐 *जरेवाडीची शाळेची गणित समृद्धी*📚
गणित म्हणजे भीती नाही तर गणित म्हणजे मज्जा ! होय गणितातील उदाहरणे सोडवण्याचे काम शक्यतो कोणाला आवडत नाही पण ही आवड निर्माण करण्याचे काम आमच्या शाळेतील गणित विभागाचे प्रमुख उद्धव पवार सर मोठ्या कल्पकतेने करत असतात .
इयत्ता सहावी ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी *Math Talent Search* ही साप्ताहिक परिक्षा घेतली जाते.यात एकूण 25 प्रश्नाला 50 गुण असतात .गणिती बेसिक संकल्पना ,वर्गस्तर संकल्पना ,तर्क ,शाब्दिक उदाहरणे ,व्यवहारातील उदाहरणे अशा विविध घटकांचा समावेश केलेला असतो .पाठ्यांशा सोबत भौमितीक संकल्पना, भौमितिक रचना,वर्ग वर्गमूळ,आलेख वाचन,पोस्ट व बँक व्यवहार, नाणी व चलन इत्यादी चा समावेश केला जातो .गणित समृद्धी चा फायदा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये होतो.यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो......!
सोबत नमुना पेपर 👇🏻
उपक्रम क्र.3
साप्ताहिक सामान्यज्ञान प्रश्न मंजुषा
यामध्ये 25 प्रश्न 50 गुणासाठी देऊन पर्यायी प्रश्न दिले जातात. शाळेने प्रकाशित केलेली सामान्यज्ञान पुस्तिका अभ्यासासाठी वापरून ही परीक्षा घेतली जाते.यामुळे स्कालरशिप परीक्षा आणि MTS यासारख्या स्पर्धा परीक्षासाठी उपयोग होतो.



No comments:
Post a Comment